-
माय लेकीचा प्रवास

प्रस्तावना नमस्कार मंडळी, खरेतर आजकाल युरोपचा प्रवास करणे ही काही विशेष गोष्ट नाही अगदी सामान्य झाले आहे सध्याच्या काळात. पण माझ्यासाठी मात्र ही गोष्ट खूप खास, अगदी मर्मबंधातली ठेव आहे. माझा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास. त्यातून शिकत असताना मिळालेल्या स्टायपेंड मधून स्वतःचा खर्च करून तसेच दरमहा काही ठराविक रक्कम माझ्यासाठी पाठवुन मित्तलने माझी सर्व जबाबदारी…
-
Berlin
Covid vaccination appointment (14 March) आज माझा व्हॅक्सिनेशन डे. सकाळी नऊची अपॉइंटमेंट होती. माझे दोन व्हॅक्सिनेशन डोस आधीच इंडियामध्ये झालेले आहेत पण मी इथे तिसऱ्या डोससाठी एलिजिबल आहे म्हणून मितालीने सांगितले की तू व्हॅक्सिनेशन घेऊन टाक. त्याचा आणखीन एक फायदा असा की त्या नंतर युरोपमध्ये फिरतांना परत परत rt-pcr टेस्ट करण्याची गरज राहणार नाही. पुढे…
-
Berlin Zoo
2 June आज आम्ही Berlin zoo बघायला गेलो. बरोबर मिताली फ्रेंड्स Deep व Shreya पण होते. मला फक्त फुल तिकीट काढावे लागले, बाकी तिघांना स्टुडंट कन्सेशन होते. Zooमध्ये शिरण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. आम्ही जिथून आत शिरलो तिथे बाजूलाच ऑफिस होते. ऑफिसमधून zooचा नकाशा घेतला. आम्हाला समोरच हत्ती दिसले. एकदम सुरुवातीलाच गणपती बाप्पाचे दर्शन झाले, समाधान…
-
Budapest, Hungary
17 May एकूण चार मोठ्या ट्रिप्सपैकी ही शेवटची “by air” ट्रिप. आम्ही हंगेरी देशातल्या बुडापेस्टला चाललो होतो आमचे विमान सकाळी अकरा वाजताचे होते आणि Potsdam ते Berlin एअरपोर्टची डायरेक्ट ट्रेन 8:05ची होती. ती बरोबर साडेआठला एअरपोर्टवर पोचणार होती. आम्ही घरून 07:40ला निघालो आमच्याबरोबर मितालीचा ग्रुप मधला मित्र दीप पण होता. तो युनिव्हर्सिटी मध्ये जाणार होता.…
-
Buda castle + Fisherman’s Bastion
18 May आम्ही सोळा नंबरच्या बसने राजवाड्याला जायचे ठरवले. बराच वेळ आम्हाला सोळा नंबरचा बस स्टॉप सापडेना. मग आम्ही एका पोलीसला विचारले. आम्ही bus stopवर पोचलो. आमच्याबरोबर एक निग्रो मुलगीपण होती. तिने तीन दिवसांची टूर बुक केली होती. त्यामुळे तिचा टूरचा ग्रुप दिसल्यावर ती राजवाड्याच्या आधीच उतरली. राजवाड्यात आल्यावर आम्ही उतरलो तिथे बुकिंग ऑफिस होते.…
-
Gyermekvasút
18 May मग आम्ही tramने निघालो. नंतर नंतर tram अगदी जंगलासारख्या भागातून आणि वर जात होती. मला लक्षात येत नव्हते आपण कुठे चाललोय. मितालीला विचारले पण ती सांगेना. तिने माझ्यासाठी सरप्राईज ट्रिप ठरवली होती. Tramच्या शेवटच्या स्टॉपला आम्ही उतरलो. Tram आता बऱ्यापैकी उंचावर आली होती. समोरच पंचवीस-तीस पायऱ्या होत्या, त्या चढून आम्ही वर गेलो तर…
-
Hostelमधली मंडळी
18 May आज आम्हाला पूर्ण दिवस भटकायचे होते म्हणून सकाळी 8:15ला तयार होऊन पहिल्या मजल्यावर ब्रेकफास्ट रूम मध्ये गेलो. पाहतो तो काय, ब्रेकफास्टसाठी Full-on गर्दी! नाश्त्यासाठी ब्रेड, बटर, दोन प्रकारचे जाम, उकडलेली अंडी, cornflakes, दोन प्रकारचे ज्यूस, सफरचंद असं होते. आम्ही अंडी, ब्रेड, बटर आणि कॉफी असे घेऊन टेबल वर बसलो. आमच्या टेबलच्या समोरच्या बाजूला…
-
Margaret island
17 May इथे एक छोटेसे बेट आहे- मार्गरेट आयलँड या नावाचे. या बेटाची लांबी 2.5 km व रुंदी 500 m असेल. या बेटावर जाण्याचा रस्ता पुलावरून होता. पुलावरून पायर्या उतरल्या की आपण बेटावरच उतरतो. मधून नदी वाहत असून त्यामुळे शहरात दोन भाग झाले आहेत आणि नदीच्या मध्ये हे मार्गरेट बेट तयार झाले आहे. बेट जरी…
-
Mallorca, Spain
9 May हे एक स्पॅनिश बेट आहे. या वेळी आम्ही विमानाने प्रवास करायचे ठरवले आहे कारण अंतर बरेच जास्त आहे; जवळपास तीन हजार किलोमीटर. आमची फ्लाईट संध्याकाळी सव्वा चार वाजताची होती घरून दुपारी 1:45ला निघालो. दोन वाजताची ट्रेन थेट विमानतळावर घेऊन जाणार होती. प्रवास साधारण अर्ध्या तासाचा होता. 2:30ला विमानतळावर पोचलो याआधीच्या आमच्या trips ट्रेन…
